धुलिवंदनाला नाशिकची एक अनोखी परंपरा आहे आणि ती म्हणजे वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक . दरवर्षीप्रमाणे यंदाही वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.📍Let's Follow
@nashikchanana
🔗मुंबई पुण्यासारख्या शहरात धुलीवंदनाच्या दिवशी साध्या पद्धतीने धुळवड साजरी केली. जाते मात्र नाशिक शहरात ज्या प्रकारे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शहरात धुळवडीच्या दिवशी अनोखी परंपरा आहे. आज सर्वत्र धुळवड साजरी केली जात आहे. नाशिक शहरात धुलिवंदनाला मात्र विशेष महत्त्व असून शहरातून दाजिबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. देवीदेवतांचे अवतार धारण करून पारंपरिक पध्दतीने जुन्या नाशिक परिसरातून दाजिबा वीराच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते. तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या वीर मिरवणुकीचे नेतृत्व पिढ्यांन पिढ्या करते आहे. हे दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याची भावना असून मिरवणूक मार्गावर तसेच घरोघरी जाऊन वीराची भाविक मनोभावे पूजा केली जाते.
🔴 दाजीबा मिरवणुकीची आख्यायिका....
नाशिक जवळच असलेल्या दिंडोरी तालुल्यातील जानोरी गावात एक गवळी राहात होता. खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची निस्सीम भक्ती करत होता. गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वरसेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता. वयाच्या 16 व्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसर्या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो. वाटेतच अज्ञाताकडून या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते. त्यावेळी दु:खी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्ये वाजण्यास सुरूवात होते. ज्याठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्याठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूदेखील लागली. यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल, अशी आख्यायिका सांगितली जाते.
#nashik #nashikchanana #holi #rangapanchami #dajibaveer #nashikroad #godavari #nashikcity #nashikgram #explorepage #trending #nashikdiaries #reelitfeelit #reelsinstagram #nashik _pixel
#rangapanchami #dhulivandan #dajibaveer2024