2 years ago
56
1
शंकर नागेश्वर मंदिर, नाळे, वसई 'Exploring Vasai on wheels' या उपक्रमाद्वारे आपण करत आहोत सायकल भ्रमंती 'वसई' प्रांताची आणि पहात आहोत सोपाऱ्यानजीकच्या नाळे गावातील प्राचीन मुर्त्या.. आजची मूर्ती : गा़ैतम ऋषि! गौतम महर्षी, हिंदू धर्मातील एक जेष्ठ ऋषी होते. ज्यांचा रामायणातच नव्हे तर जैन आणि बौद्ध धर्मातही उल्लेख आहे. इंद्राशी संबंध ठेवल्यानंतर त्यांनी आपली पत्नी अहल्येला शाप दिल्याची कथा वाचायला मिळते ती अशी.. "गौतमांच्या पत्नीचे नाव अहल्या. इंद्राने भ्रष्ट केल्याने ही गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा (दगड) बनली. पुढे रामारायाच्या पावन पदस्पर्शाने ती परत मनुष्यरूपात आली. तर याच गौतमांच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्र भोके पडली. त्या भोकांचे उ:शापामुळे डोळे झाले. या हजार डोळ्यांमुळे इंद्राला सहस्राक्ष म्हणतात." गौतम ऋषिंशी संबंधित आणखी एक महत्त्वाची कथा गोदावरी नदीच्या निर्मितीविषयी आहे, जी गौतमी म्हणूनही ओळखली जाते. हे वैवस्वत मन्वंतरातल्या सप्तर्षींमधील एक ऋषी आहेत. आकाशात दिसणाऱ्या सप्तषीं ताऱ्यांध्ये ह्याचे नाव नाही. कोकणातल्या काही जुन्या मंदिरात गा़ैतम ऋषींच्या मुर्ती पहायला मिळतात. सदर मुर्ती कुठल्या कालखंडात घडवली याबद्दलचा ईतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या आगामी इतिहास सफरीत नक्की सामील व्हा! मित्रांनो, वसई-पालघर जिल्ह्यातील गडकिल्ले, समुद्रकिनारे आणि पुरातन देवालयांच्या भटकंतीकरीता आम्हाला हक्काने संपर्क साधा. आपल्या व आपल्या मित्र मंडळी, कुटुंबासाठी एखादी ट्रिप आयोजित करायला आम्हाला नक्की आवडेल. लवकरच भेटू वसईतील अजून एका भटकंतीसह.. Bhovara 9969285045 #bhovara #vasai #cyclelife #cycleride #cyclinglife #photography #heritage #bloggerstyle #bloggers #architecture #architecturephotography #shiva #vasaitourism #vasaicycling #pedalpower #sahyadri #history #maharashtra #tourism #maharashtratourism #wanderlust #भोवरा #महाराष्ट्र #वसई #महादेव
वाह !!
2 years ago